💐👍💐👍💐
** विद्यार्थ्यांना करून दाखविण्यासारखे जादूचे प्रयोग **
🌺* जादू कुंकू काळे करण्याची🌺
शिक्षित लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे.
अर्धा लहान चमचाभर कुंकू व निरमा पावडर घ्या.
निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते
नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.
🌺🌺** जादू हळदीचे कुंकू करण्याची🌺🌺
बाबालोक हळदीमध्ये थोड्या प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते. नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्याभाबड्या लोकांना घाबरवून फसवतात.
🌺🌺* वस्तू गोड करणे🌺
सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते.
बाबालोक ज्याही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते
तिर्थ गोड होते
यासाठी बाबालोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते
बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.
*🌺लिबांतून रक्त काढणे🌺
साहित्य--एक लिंबू,चाकू, मिथील ऑरेंजचे द्रावण
चाकूच्या पात्याला मिथील ऑरेंजचे द्रावण लावावे. थोड्या वेळाने त्या चाकूने लिंबू कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो. ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करून दाखवू शकता व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता.
🌺* ताब्यांचे भांडे वर उचलणे🌺
ताब्यांचा लोटा घ्या(भरणे) तो काठोकाठ तांदळाने भरून घ्या
त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा
तांदळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या
तांब्या वर उचलला जाईल.
*🌺🌺 पृथ्वी तून परमेश्वर प्रगट करणे🌺🌺
हा प्रयोग विद्यार्थ्यांना शाळेत करून दाखवा.
एक जमिनीमध्ये खड्डा खोदा त्यामध्ये आधीच एक दोन किलो चणे टाकून ठेवा.
त्यावर मुर्ती समजून एक चपटा दगड ठेवा व वर माती झाकून ठेवा दोन तिन दिवस त्यावर थोडे थोडे पाणी घालावे चौथ्या दिवशी मूर्ती म्हणून ठेवलेला दगड वर येईल. विद्यार्थ्यांना यामागचे शास्त्रीय कारण समजावून द्या
🌺 * मत्रांने होम पेटविणे🌺
कृती. ... फॉस्फरस कपड्यात गुडांळुन सफाईदार पणे होमात ठेवा
जाळ होइल किंवा कागदावर पोटॅशियम परमॅग्नेट आधीच लाकडामध्ये टाकूण ठेवून त्यावर तुप ओता(येथे तुप म्हणून ग्लिसरीन ओतावे म्हणजे आपोआप जाळ होइल ग्लिसरीन मध्ये पेट्रोल टाकल्यास ही क्रिया लवकर होते
सर्व प्रयोग करतांना भोदूंबाबाची अॅक्टींग करावी म्हणजे प्रयोगामध्ये जिवंतपणा येइल.
लहान मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करू न देता समजावून करून दाखवावे हे प्रयोग विज्ञान प्रदर्शनी मध्ये करून दाखवू शकता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा