शनिवार, २५ जून, २०१६

Whatsapp तंत्राचा स्मार्ट वापर

📱📱 *तंत्राचा स्मार्ट वापर* 📱📱📱

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*'व्हॉट्सअॅप'शिवाय आता आपले पानही हलत नाही; पण या अॅपचा 'स्मार्ट' वापर करण्याच्या सगळ्या ट्रिक्स आपल्याला माहिती असतातच असे नाही. अशाच काही वेगळ्या क्लृप्त्यांविषयी...* 



_*'लास्ट सीन' आहे तसेच ठेवणे*_ 


इंटरनेट बंद करून 'व्हॉट्सअॅप'वर मेसेज टाइप करून पाठवला आणि मग व्हॉट्सअॅप बंद करून इंटरनेट चालू केले, तर 'लास्ट सीन' पूर्वी होता तोच राहतो. बदलत नाही. 


_*फोन नंबरशिवाय व्हॉट्सअॅप वापरणे*_

व्हॉट्सअॅप डाउनलोड केल्यावर मोबाइल फोन 'फ्लाइट मोड'वर ठेवून 'व्हेरिफिकेशन मेसेज' ब्लॉक करा. त्यानंतर 'व्हेरिफाय थ्रू ई-मेल' हा पर्याय निवडून ई-मेल आयडी टाका आणि सेंडिंग मेसेज कॅन्सल करा. अशा प्रकारे आपण फोन नंबरशिवायही व्हॉट्सअॅप वापरू शकतो. 



_*डिलिटेड मेसेज वाचण्यासाठी काय करावे?*_ 

'व्हॉट्सअॅप'च्या डेटाबेस फोल्डरमध्ये जा. त्यात 'msgstore-2014-01-04.1.db.crypt' आणि 'msgstore.db.crypt' अशा दोन फाइल्स दिसतील. त्यापैकी दुसरी फाइल 'backup-msgstore.db.crypt' या नावाने सेव्ह करा. त्यानंतर मेसेज असलेली फाइल 'msgstore.db.crypt' या नावाने सेव्ह करा. आता सेटिंग्स-अॅप्लिकेशन्स-मॅनेज अॅप्लिकेशन्स-व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन 'क्लिअर डेटा'वर क्लिक करा. व्हॉट्सअॅप ओपन करून बॅकअप रिस्टोअर करा. 


_*आपला मेसेज नेमका किती वाजता वाचला आहे हे पाहणे *_

मेसेजवर लाँग प्रेस करा. मग उजवीकडच्या कोपऱ्यातील 'i' (Info)पर्याय निवडा. त्यावर हा मेसेज किती वाजता वाचला गेला आहे, हे कळेल. 

_*दुसऱ्याचा डीपी बदलणे*_ 

हे तुम्हाला सहज करता येते, पण फक्त तुमच्याच फोनसाठी. ५६१x५६१ आकाराचा एक फोटो एसडी कार्डमध्ये सेव्ह करा आणि तुमच्या मित्राचा फोन नंबर वापरून तो रिनेम करा. 


_*फोन नंबर बदलणे*_ 

यासाठी सेटिंग्ज-अकाउंट-चेंज नंबर या मार्गाने जा. 


_*काँटॅक्ट ब्लॉकिंग कसे ओळखावे?*_ 


संबंधित व्यक्तीला एखाद्या ग्रुपमध्ये अॅड करण्याचा प्रयत्न करा. ते होत नसेल, तर त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे, हे समजून जा. 


_*ब्लू टिक्स नाहीशा करणे *_

यासाठी सेटिंग्ज-अकाउंट-प्रायव्हसी यामध्ये जाऊन 'रीड ‌रेसिपिएंट'चा पर्याय डिसेबल करा. 

_*काही गमतीदार गोष्टी *_

हल्ली 'व्हॉट्सअॅप'वर काही फसवे मेसेजही दिसतात. म्हणजे चित्र दिसते एक आणि त्यावर क्लिक केल्यावर ओपन मात्र भलतेच चित्र होते. ही किमया आहे *एफएचयू अॅप (fhuapp) आणि 'मॅज‌िअॅप'ची (magiapp).* 

'व्हॉट्सअॅप'वर आपण नेमका किती वेळ घालवतो, कोण आपले प्रोफाइल सगळ्यात जास्त वेळा पाहते, हे सगळे समजण्यासाठी *व्हॉट्सस्टेट हे अॅप वापरता येते.* 

*एखाद्या खास मित्राला एका विशिष्ट वेळेला काही मेसेज पाठवायचा असेल, तर त्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेंजर शेड्युलर लाइट (WhatsApp messenger scheduler lite) हे अॅप वापरता येईल.* 

आपली प्रिय व्यक्ती कधी ऑनलाइन येते, हे *व्हॉट्सडॉग* या अॅपच्या साह्याने सहज कळते. 

*'व्हॉट्सटूल्स'* या अॅप्लिकेशनद्वारे आता आपण एक जीबीपर्यंतची पीडीएफ फाइल पाठवू शकतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰
      📝 *संकलन*📝

*मराठीचे शिलेदार समुह*